Marathi Biodata Maker

थंडीपासून बचाव करताना...

Webdunia
शनिवार, 23 जानेवारी 2021 (08:18 IST)
व्हिटॅमिन सी-यु्रत फळेः शरिरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण अँटी ऑक्सिडेंटयुक्त फळ आणि  भाज्यांचे सेवन करायला हवे. यासाठी संत्री, चेरी, लिची, लिंबू याचा आहारात नियमित समावेश करायला हवा. व्हिटॅमिन सी हे शरीरात रक्ताच्या पेशी वाढवण्यासाठी मदत करते.
 
हळदः भारतीय आहारशैलीत हळदीचा प्रामुख्याने वापर होतो. अशावेळी हळदीचा अधिक लाभ मिळवण्यासाठी हळदीचा चहा घेण्याची सवय सुरू करायला हरकत नाही. त्याचबरोबर रात्री झोपताना हळदीचे दूध घेतल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत मिळते. हळद-गुळाची गोळी देखील घसा चांगला करण्यास मदत करते.
 
दहीः रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी दहीदेखील उपयुक्त पदार्थ आहे. जेवणाबरोबर दररोज दही खाल्ल्यास अनेक आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते. दहीपासून तयार केलेले ताकही आरोग्यवर्धक आहे. याशिवाय दह्याची कोशिंबिर, दहीभातदेखील आरोग्याला लाभदायी आहे.
 
चहा : थंडीच्या दिवसांत चहा हे सर्वात आवडीने घेतले जाणारे पेय आहे. चहामुळे थकवा, क्षीण दूर होतो. तसेच घशातील खवखवदेखील थांबते. चहामुळे सर्दी, पडसे कमी होते. लहान-मोठ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी चहा उपयु्रत ठरतो. आजकाल चहाचे बरेच प्रकार बाजारात उपलब्ध असून आवडीनुसार चहाची निवड करु शकतो.
 
दालचिनीः दालचिनी हा केवळ मसाल्याचा पदार्थ नसून अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त  पदार्थ आहे. आहारात दालचिनीचा वापर केल्यास शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
डॉ. मनोज कुंभार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

परफेक्ट विंग्ड आयलाइनर लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

घट्ट बूट घातल्याने तुमच्या पायाच्या तळव्यांना वेदना होऊ शकतात, वेदनांची मुख्य कारणे जाणून घ्या

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी या योगासनांचा सराव करा

लघु कथा : शिकारी आणि साप

कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी सोपा उपाय

पुढील लेख
Show comments