rashifal-2026

बॅग कशी भरायची

Webdunia
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (12:47 IST)
आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी 
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
फापट पसारा आवरून सारा, 
आता सुटसुटीत व्हायचं  आहे  !
 
याच्या साठी त्याच्या साठी, 
हे हवं, ते हवं 
इथे तिथे - जाईन जिथे, 
तिथलं काही नवं  नवं 
हव्या हव्या चा हव्यास आता 
प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, 
बॅग हलकी स्वतः पुरती 
आता फक्त ठेवायची आहे ! 
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे ! 
 
अपेक्षांच्या ओझ्याखाली 
आजवर त्रस्त होतो 
आयुष्याच्या होल्डॉल मध्ये 
काय काय कोंबत होतो !
किती बॅगा किती अडगळ !
साठवून साठवून ठेवत होतो 
काय राहिलं, कुठे ठेवलं 
आठवून आठवून पाहत होतो 
त्या त्या वेळी ठीक होतं 
आता गरज सरली आहे, 
कुठे काय ठेवलंय ते ते 
आता विसरून जायच आहे 
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
 
खूप जणांनी खूप दिलं 
सुख दुखाःचं भान दिलं 
आपण कमी पडलो याचं 
शल्य आता विसरायचं आहे !
 
मान, अपमान, ‘मी’ , ‘तू’
यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
 
आत बाहेर काही नको 
आत फक्त एक कप्पा, 
जना - मनात एकच साथी 
सृष्टी करता एकच देवबाप्पा ! 
 
सुंदर त्याच्या निर्मिती ला 
डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत 
अलगद उठून जायचं आहे 
 
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

Flashback : ओटीटी प्लॅटफॉर्मवर या अभिनेत्रींनी भारतीय कथांना एक नवीन परिमाण दिला

Dhurandhar चित्रपटातील 'आलम सोडा' का व्हायरल होत आहे? या अनोख्या पेयाची रेसिपी जाणून घ्या

विद्युत जामवालने चेहऱ्यावर जळत्या मेणबत्तीचा मेण ओतला, व्हिडीओ व्हायरल

अनिल कपूर यांच्या संघर्षादरम्यान त्यांच्या पत्नीने आर्थिक मदत केली

अजय देवगणच्या दृश्यम 3 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

पुढील लेख
Show comments