Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विश्वात आजवरि शाश्वत काय झालें

विश्वात आजवरि शाश्वत काय झालें
Webdunia
शुक्रवार, 28 मे 2021 (14:31 IST)
पौर्वात्य खंड अवघें जित यत्प्रतापें
दारिद्रय आणि भय कांपति ज्या प्रतापें
नाशासि पारसिक तेहि पलांत गेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
 
तें जिंकी पारसिक, दे जगता दरातें
जें दिग्जयी बल तुझेंहि शिकंदरा, त
ध्वंसीत रोम तव राजपुरीं रिघालें
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
 
साम्राज्य विस्तृत अनंत असेंचि साचें
त्याही महाप्रथित रोमकपत्तनाचें
हूणें हणोनि घण चूर्णविचूर्ण केलें
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
 
हा उन्नती अवनतीस समुद्र जातो
भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो
उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
 
जे मत्त फारचि बलान्वित गर्ववाही
उद्विग्न- मानस उदासहि जे तयांहीं
हें पाहिजे स्वमनिं संतत चिंतियेलें
विश्वात आजवरि शाश्वत काय झालें?
 
-विनायक दामोदर सावरकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

सुंदर त्वचेसाठी नारळ तेल सर्वोत्तम आहे, त्याचे 5 फायदे जाणून घ्या

चविष्ट आणि आरोग्याला फायदेशीर राजगिरा शिरा रेसिपी

घरात ठेवलेल्या या 3 इलेक्ट्रिक वस्तूंमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, त्या ताबडतोब काढून टाका

डोक्यावर मेंदी लावण्याचे 5 सौंदर्यवर्धक फायदे जाणून घ्या

झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत फक्त दोन लवंगा खा, तुमचे आरोग्य सुधारेल

पुढील लेख
Show comments