Marathi Biodata Maker

Soup Recipe: ट्राय करा नवीन काहीतरी....बटाटा पालक सूप जाणून घ्या रेसिपी

Webdunia
गुरूवार, 11 जुलै 2024 (20:50 IST)
सूप एक आरामदायक आणि आरोग्यादायी रेसिपी आहे. जे अनेकांना मनापासून आवडते. आज आपण बटाटा आणि पालकपासून बनणारी चविष्ट सूप रेसिपी पाहणार आहोत. तर चला लिहून घ्या रेसिपी.
 
साहित्य-
100 ग्रॅम बटाटे साल कडून कापलेले 
30 ग्रॅम कांद्याची पात कापलेली 
50 ग्रॅम बटर 
20 मिली जैतून तेल
300 मिली फुल क्रीम दूध
60 मिली क्रीम
150 ग्रॅम पालक कापलेला 
8 लसूण पाकळ्या-तुकडे करून घ्यावे 
60 ग्रॅम कांदा कापलेला 
1 चमचा ओवा कापलेला 
चिमुभर जायफळ पूड 
मीठ चवीनुसार 
 
कृती-
1. एका पॅन मध्ये तेल गरम करावे. यामध्ये कापलेला कांदा,पात,  ओवा, लसूण घालावे आणि काही मिनिट परतवावे.
 
2. कापलेले बटाटे घालावे, त्यानंतर मीठ घालावे.
 
3. कमीतकमी पाच मिनिटानंतर दूध घालावे आणि गॅस लहान करून वीस मिनिट शिजवावे. 
 
4. आता बटाटे एक स्मूथ सूप कंसिस्टेंसी मध्ये ब्लेंड करावे. 
 
5. चवीसाठी क्रीम आणि जायफल घालावे. 
 
6. पालकाला बटर आणि मसाले लावावे. तयार बटाटा सूप मध्ये पालक मिक्स करून सर्व्ह करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यातील सुपर ड्रिंक गाजर ज्यूस रेसिपी

समोरचा प्रेम करत आहे की फ्लर्ट? या ५ लक्षणांद्वारे सत्य जाणून घ्या

आवळ्याचा मोरावळा वर्षानुवर्षे टिकवण्यासाठी या ५ चुका टाळल्या पाहिजेत, अगदी रसरशीत राहील

वजन कमी करण्यासाठी आणि टाइप २ मधुमेहावर उपचार करण्यासाठी लोकप्रिय असलेले ओझेम्पिक हे औषध भारतात लाँच, किंमत जाणून घ्या

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मखाण्याच्या तीन पाककृती ट्राय करा

पुढील लेख
Show comments