Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉंग्रेसला बदनाम करण्याचा भाजपचा धंदा

Webdunia
सोमवार, 13 जून 2022 (15:10 IST)
राहुल गांधींच्या चौैकशीवरुन नाना पटोले यांची भाजपवर टीका
 
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी  आज चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समोर हजर झाले आहेत. दरम्यान, राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसतर्फे (Congress) आज देशभरातील ईडीच्या २५ कार्यालयांबाहेर निदर्शने केली जाणार आहेत. ही भ्याड कारवाई आहे, अशा शब्दात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
नाना पटोले म्हणाले की, २०१४ पासून अत्याचारी भाजप सरकार आले आहे. त्या विरोधात आमची लढाई आहे. गांधी परिवाराने देशाला घडवले असून सर्वसामान्य माणूस हा गांधी परिवारासोबत आहेत. तर, डाकू आणि चोरांची चौकशी केली जाते. पण, हे गांधी परिवाराची चौकशी करत आहेत. मोदी सरकार आल्यावर बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी निर्दोष आहेत, असे म्हंटले होते.
 
मोदी सरकार कायम नेहरू गांधी परिवाराला टार्गेट करतात. हा आम्हाला बदनाम करण्याचा भाजपचा धंदा आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments