Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Webdunia
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (09:00 IST)
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा (१६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट) राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी राजघाटवर संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव सकाळी ६ ते ९ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १० ते १ दरम्यान पार्थिव भाजपा केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येईल. दुपारी एक ते दीड वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी राजघाटवर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

IND vs SA: स्मृतीमंधानाने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले

Boxing: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी लोव्हलिना बोर्गोहेनने जिंकले रौप्यपदक

अरुंधती रॉय यांच्यावर यूएपीए अंतर्गत दाखल झालेल्या खटल्याचा अर्थ काय आणि पुढे काय होणार?

बारामतीत आता सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया आणि अजित विरुद्ध युगेंद्र असा संघर्ष पाहायला मिळणार का?

मुस्लीम समाज वर्षातून किती वेळा ईद साजरी करतो, जाणून घ्या सविस्तर

पुढील लेख
Show comments