Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ashtami Mahagauri Puja महागौरी पूजा विधी, मंत्र, नैवेद्य

Webdunia
Shardiya Navratri 2023 Day 8th Mahagauri Pujan नवरात्रीचा आठवा दिवस माता महागौरीला समर्पित आहे. या दिवशी महागौरी मातेची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. जगदंबेला प्रसन्न करायचे असेल तर विधीप्रमाणे मातेची पूजा करावी. 
 
महागौरी पूजन विधी
अष्टमी तिथीला सकाळी स्नान-ध्यान पश्चात कलश पूजन करुन देवीची विधीपूर्वक पूजा करावी. या दिवशी देवीला पांढरे फुलं अर्पित करावे आणि वंदना मंत्राचे उच्चारण करावे. या दिवशी देवीला शिरा-पुरी, भाजी, काळे चणे आणि नारळाचे नैवेद्य दाखवावे. अष्टमी पूजनाच्या दिवशी कन्या भोज करवावे.
 
कन्या पूजन लाभ
माँ महागौरीचे ध्यान, स्मरण आणि उपासना भक्तांसाठी सर्वात फायदेशीर आहे. मनुष्याने त्यांचे नेहमी ध्यान केले पाहिजे, त्यांच्या कृपेने अलौकिक सिद्धी प्राप्त होतात. देवी भक्तांचे संकट लवकर दूर करते आणि त्याचे पूजन केल्याने अशक्य कामेही शक्य होतात. ते माणसाच्या प्रवृत्तीला सत्याकडे प्रेरित करतात आणि असत्याचा नाश करतात. भक्तांसाठी देवी अन्नपूर्णा मातेचे रूप आहे, म्हणून अष्टमीच्या दिवशी मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. देवी संपत्ती, वैभव आणि आनंद आणि शांतीची प्रमुख देवी आहे.
 
या प्रकारे देवीचे नाव महागौरी असे पडले
आपल्या पार्वती रूपात या देवीने महादेवाला पती रुपात प्राप्त करण्यासाठी तप केले होते. या कठोर तपामुळे त्यांचे शरीर काळे पडून गेले होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न व तृप्त होऊन जेव्हा भगवान शिवाने गंगेच्या पवित्र पाण्याने त्यांचे शरीर धुतले तेव्हा त्या विजेच्या दिव्यासारखी अत्यंत तेजस्वी झाल्या आणि तेव्हापासून त्यांचे नाव महागौरी पडले.
 
महागौरी स्तुती मंत्र
श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।
 
महागौरी प्रिय नैवेद्य आणि पुष्प
माँ दुर्गेचे आठवे रूप महागौरीला मोगर्‍याचं फुलं खूप प्रिय आहे. अशात साधकाने या दिवशी मातेच्या चरणी हे फूल अर्पण करावे. यासोबतच आईला नारळ बर्फी आणि लाडू अर्पण करावेत. कारण नारळ हे आईचे आवडते नैवेद्य मानले जाते.

संबंधित माहिती

Gautam Buddha Stories भगवान बुद्ध यांच्या 5 प्रेरणादायी कथा

Solah Somwar fastसोळा सोमवार व्रत सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

somvar mahadev mantra jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

Somwar Aarti सोमवारची आरती

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

पुढील लेख
Show comments