Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी 12 पथके सांगली जिल्ह्यात

12 squads in Sangli district to restore power supply disrupted by floods
Webdunia
सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (10:10 IST)
पुरामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाच्या माध्यमातून युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महावितरणच्या पुणे, बारामती परिमंडळातून 48 पथके कोल्हापूर येथे तर 12 पथके सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आली असून त्यांचे काम सुरू आहे. या पथकांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील 13 उपकेंद्र, 2 हजार 894 रोहित्र दुरूस्त करण्यात आले असून एकूण 1 लाख 30 हजार 462 ग्राहकांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 26 उपकेंद्रे, 3 हजार 818 रोहित्रे दुरूस्त करण्यात आली असून 1 लाख 84 हजार 822 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरूळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे पुरेशा साहित्याची उपलब्धता करण्यात आली आहे.
 
तसेच पूरस्थितीमध्ये बंद झालेल्या सांगली जिल्ह्यातील 45 मार्गापैकी 39 मार्गावरील एसटीची वाहतूक पुर्ववत सुरु करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील बंद असलेल्या 31 मार्गापैकी 26 मार्गावरील एसटीची वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दल मोठी अपडेट

मलेशियात गॅस पाईपलाईन फुटली, भीषण आगीत 100 हून अधिक लोक मृत्युमुखी

LIVE: दादर येथे तरुणीची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या

प्री वेडिंग शूट नंतर वर आवडला नाही, तिने त्याला मारण्यासाठी सुपारी दिली, आरोपींना अटक

रतन टाटांची शेवटची इच्छा काय होती, ३८०० कोटी रुपये कसे वाटले जातील: कोणाला काय मिळेल?

पुढील लेख
Show comments