Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्र्यंबकेश्वर जवळील वेळुंजे येथे बिबट्याने घेतला चिमुरड्याचा जीव

Webdunia
सोमवार, 26 डिसेंबर 2022 (08:04 IST)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथे वेळुंजेतील मळ्यातील निवृत्ती दिवटे, यांचा आर्यन या सहा वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत जंगलात ओढून नेले. दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंदाज घेत घराच्या दरवाज्यात उभे असलेल्या बाळाला लक्ष केले, सदरची झटपट त्या बालकाच्या छोट्या बहिणीने पहिल्या वर ती जोरात किंचाळली परंतु घरातील माणसे जमा होण्याच्या अगोदर बिबट्या बाळाला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेला.
 
घरातील माणसांनी गावातील लोकांना कळवले जवळपास अर्धा गाव रात्री पर्यंत बाळाचा शोध घेत होते अखेर रात्री दहा वाजेच्या सुमारास घरापासुन  250 मीटर अंतरावर बाळाचा मृतदेह सापडला. घटना घडल्या नंतर दीड तासा नंतर वनविभाग यंत्रणा घटनास्थळी पोहचली. या भागात वारंवार बिबट्याची दहशत असून वनविभाग सतत याकडे कानाडोळा करत आहे. भागातील लोकांनी तक्रार करून देखील वनविभाग अजून मात्र झोपेतच आहे काय ? असा सवाल उपस्थितीत होतो आहे. याच परिसरातील धुमोडी येथेही मागील काही महिन्यांपूर्वी बिबट्याने एका बालिकेचा बळी घेतला होता, तेव्हाही पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थां कडून होत होती. वनविभागाने ग्रामस्थांचे न ऐकल्याने  आज पुन्हा एक बळी गेला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शवविच्छेदन झाल्यानंतर आज सदर बालकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

वारंवार या बघात बिबट्याने शेतकऱ्यांच्या पशुधनावर, बालकांवर हल्ले चालवले आहे. शेतकऱ्यांना  रात्रीबेरात्री शेताला पाणी देण्यासाठी जावे लागते. या घटनेने संपूर्ण गाव दहशती खाली आले आहे. वनविभागाने नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करावा.  
 
समाधान बोडके,  शिवसेना नेते
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू

अमित शहांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला

LIVE: युसूफ अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

शरद पवार आणि अजित पवार सातारा येथील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर

किरीट सोमय्या यांना धमकी दिल्याबद्दल युसूफ अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments