Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पन्हाळ्यावर पर्यटनाला आलेल्या चिमुकल्यावर काळाचा घाला; दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 20 एप्रिल 2023 (07:44 IST)
पन्हाळा : पन्हाळागडावर पर्यटनासाठी आलेल्या सहपरीवार दबडे कुटुंब चहा पिण्यासाठी तबक उद्यानासमोर थांबले असता इंद्रनील अरुण दबडे वय वर्ष दोन राहणार खानापूर, तालुका भुदरगड जिल्हा, कोल्हापूर. यांने आईचा हात सोडून रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला.
यातील माहितीनुसार, अरुण दबडे आणि त्यांचे कुटुंबीय जोतिबा वरून पन्हाळा  पाहण्यासाठी आले असता, सोबत त्यांचे आई-वडील  मित्रपरिवार आले होते. सज्जाकोटी पाहण्यासाठी निघाले असता तबक उद्यान समोरील चहाच्या टपरीवर थांबले होते,  त्या ठिकाणी  दबडे परीवाराचे फोटो काढणे सुरू होते यादरम्यान  इंद्रनील यांने आपल्या आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे उभे असलेले त्याचे आजोबा यांच्याकडे धाव घेत असताना  सज्जाकोटी कडून येणारी एम एच ४५ ए एल ६२०३ ही सुधीर कुमार हांडे रा. करमाळा यांच्यी चार चाकी गाडी भरधाव येत असताना यावेळी इंद्रनील हा हंडे यांच्या गाडीच्या उजव्या बाजूच्या चाकाखाली आला त्याचबरोबर गाडीचे मागील चाकही इंद्रनील चा डोक्यावरून गेले यामध्ये तो गंभीर जखमी झाला  स्थानिकांच्या मदतीने इंद्रनील याला पन्हाळा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले तथापी पुढील उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालय येथे नेण्यात आले यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले यावेळी दबडे कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.  
 
अशा अपघाताची घटना प्रथमच पन्हाळ्यावर घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.  तबक उद्याना जवळील गर्दी, रस्त्यावरील अतिक्रमण आणि वाहतुकीचा बेशिस्तपणा यामुळे  वारंवार असे छोटे अपघात होत असतात त्याचबरोबर पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबीयांनी पण आपल्या लहान मुलांच्या कडे जबाबदारीपणाने लक्ष देण्याची पण गरज आहे. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात असणारी रुग्णवाहिका चालक नसल्याने बंद अवस्थेत आहे त्यामुळे आज १०८ रुग्णवाहिका बोलवुन घेण्यात आली त्यात एक तास वेळ गेला कदाचित या वेळेचा सदुपयोग होवुन इंद्रनील दबडे याचे प्रमाण वाचले असते.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी म्हणाले- राजकारण करू नका, मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय हवा

महाविकास आघाडीत सर्व जागांवर एकमत, 25 जागांवर घेणार हायकमांड घेणार अंतिम निर्णय

मुंबईहून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये इमर्जन्सी अलर्ट, विमान हवेत फिरते

पंखे वाले बाबा कोण ? 'लड्डू मुट्या' का होत आहे व्हायल ?

रेल्वे बुकिंग व्यवस्थेत मोठा बदल, आता किती दिवसांपूर्वी तिकीट बुक करता येईल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments