Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता दुकानदारी बंद करावी; गिरीश महाजन यांची खडसेंवर जहरी टीका

Webdunia
सोमवार, 20 डिसेंबर 2021 (15:11 IST)
एकनाथ खडसे यांना १५ वर्षे लाल दिव्याची गाडी अन् १२ खाती मिळाली तरीही ते मतदारसंघाचा विकास करू शकले नाहीत. चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला शिक्षा दिलीय. कमिशनसाठी लल्लु पंजु भांडतात आणि कसा विकास होईल? आता कितीही आवाज चढवला तुमची धार बोथट झाली आहे. आता तुमचं खरं नाही दुकानदारी बंद करा, अशा शब्दांत भाजप नेते आ. गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर जहरी टीका केली आहे.
 
महाराष्ट्रात सध्या नगर पंचायत निवडणुकीचं वारं सुरु आहे. बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता, असे म्हणत महाजन यांनी प्रचार सभेत खडसेंवर टीका केली.
 
ज्या वेळेस एकनाथ खडसे समोरील प्रचारसभेत खडसे शेरोशायरी करत असल्याचे ऐकताच. त्यावर गिरिश महाजनांनी खडसेंवर टीकेची संधी साधली. शेरोशायरी करता स्वत:ला तुम्ही सव्वाशेर म्हणवून घेतात ते तुम्हाला लिहून देताना तुम्ही वाचतात. तुमचं हेच का आता की तुम्ही शेरो शायरी करावी. मात्र, आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झाले असल्याचा टोलाही महाजनांनी खडसेंना लगावला.
 
खडसे मतदारांना सांगतात, गिरीशभाऊंना मोठं केलं. मला कुणी मोठं केलं नाही विकासकामांमुळे मी मोठा झालो. लोकांची कामे करावी लागतात. लोकांची सेवा केली म्हणून आतापर्यंत लोकांनी निवडून दिलं. कमीत कमी २५ हजारच्या लीडने निवडून दिलं आहे. मी आतापर्यंत कधी पंचवीस हजाराच्या खाली आलो नाही. तुम्ही तर कधी अठराशे रुपये अठराशे मताने कधी आठ हजार मतांनी असे निवडून आले आहेत, असं देखील गिरीश महाजन म्हणाले.
राज्यात व जळगाव जिल्ह्यात शेतकर्‍यांना काय नुकसान भरपाई मिळाली. या महाविकास आघाडीने सरकारने तोंडाला नुसतीच तोंडाला पाने पुसली. मोठ्यांची नावं रेशनकार्डावर आणि गरजू रेशनकार्डपासुन लाभापासून वंचित असे म्हणत महाजनांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीच्या काळात गेल्या दोन वर्षांत एकही भरती झाली नाही. अन जी भरती झाली त्यातही भ्रष्टाचार, असे म्हणत म्हाडा असो की आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील पेपरफुटीवरुन महाजनांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. बोदवड शहरामध्ये पाणी पिण्यासाठी मिळत नाही महिलांचे हाल होत असतात मात्र हे त्यांना दिसत नाही. राज्य सरकारने दारू स्वस्त केली आणि प्यायला पाणी नाही. आता लोकांनी दारू प्यायची का अशा शब्दांतही महाजन यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: टाइमपाससाठी सत्र सुरू- उद्धव ठाकरे

एल्गार प्रकरणातील आरोपी रोना विल्सनला जामीन नाही, न्यायालयाने म्हटले- त्याची गरज नाही

Year Ender 2024 : 2024 ची Hottest Car ज्याने भारतात खळबळ उडवून दिली, परवडण्यायोग्य असण्यासोबत वैशिष्ट्ये देखील दमदार

Gwalior-Agra Expressway ने 3 राज्ये जोडली जातील, प्रवासाचा वेळ कमी होईल, पहा संपूर्ण मार्ग

Mahayuti Leaders Controversy मंत्री न केल्याने महायुतीचे नेते नाराज, तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तणाव वाढला

पुढील लेख
Show comments