Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

KTM 790 Duke भारताच झाली लाँच, मिळेल फक्त 100 ग्राहकांना, जाणून घ्या याची किंमत

Webdunia
सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (16:35 IST)
KTM ने भारतात आपली बहुप्रतीक्षित मिडलवेट स्पोर्ट नेकेड बाइक 790 Duke ला लाँच केले आहे. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात प्रिमियम आणि   फ्लॅगशिप बाइक आहे. जे लोक स्पोर्टी आणि हाय परफॉरमेंस बाइक चालवणे पसंत करतात त्यांना लक्षात ठेवून कंपनीने या बाइकला तयार करण्यात आले आहे.
 
KTM 790 Duke ची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपये एवढी आहे. भारतात ही CKD युनिटच्या रूपात येणार आहे आणि फक्त 100 युनिट बाइक भारतासाठी अलॉट करण्यात आल्या आहेत. अर्थात जर तुम्ही या बाइकची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लवकरच KTM डीलरशिपशी  संपर्क करावा लागणार आहे.
 
या बाइकचे डिझाइन फारच स्पोर्टी आणि शार्प आहे. यात शार्प स्टाइल फ्यूल टँक, एलईडी हेडलॅम्प, स्प्लिट सीट्स आणि एलईडी टेललाइट बघायला मिळते. बाइकमध्ये 4 रायडिंग मोड आणि 17-इंचीचे अलॉय वील्ज देण्यात आले आहे. बाइकमध्ये फुल टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. ही बाइक इंटरनॅशनल मार्केटमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे.
 
KTM 790 Duke मध्ये पावरफुल 799cc, पॅरलल ट्विन इंजन आहे, जो 105hp चा पावर आणि 86Nm पीक टॉर्क जनरेट करतो. इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. उत्तम ब्रेकिंगसाठी याच्या फ्रंटमध्ये 300 mm ड्यूल डिस्क आणि रियरमध्ये 240 सिंगल डिस्क ब्रेक आहे. सेफ्टीसाठी यात बॉश कॉर्नरिंग एबीएस, लीन-ऐंगल सेंसिंग ट्रॅक्शन कंट्रोल, लाँच कंट्रोल आणि बाय डायरेक्शनला क्विक शिफ्टर सारखे फीचर्स बघायला मिळतात. सध्या KTM 790 Duke फक्त मुंबई, दिल्ली, बेंगलुरु, पुणे, कोलकाता, हैदराबाद, सुरत, गुवाहाटी आणि चेन्नईमध्ये उपलब्ध होईल. आणि एप्रिल 2020 पर्यंत ही 30 इतर शहरांमध्ये उपलब्ध करवण्यात येईल.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments