बऱ्याचदा अन्न शिजवताना योग्य कल्पना नसल्याने अन्नाची चव खराब होते. या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे अन्नाची चव चांगली होईल.
1 उन्हाळ्यात रायता खायला आवडतंय .रायता चविष्ट बनविण्यासाठी त्यात हिंग आणि जिरे घाला. रायताची चव वाढेल.
2 कांदा भाजीत शिजायला वेळ लागतो. कांदा पटकन शिजण्यासाठी थोडी साखर घाला कांदा तपकीरी लवकर होईल.
3 राजमा शिजवताना मीठ घालू नका, राजमा लवकर शिजत नाही.
4 भेंडी ठेवल्याने एक दोन दिवसातच मऊ पडते. त्यासाठी भेंडीला मोहरीचे तेल लावून ठेवावे.
5 ग्रेव्ही ची भाजी बनवताना ग्रेव्ही ची चव वाढविण्यासाठी त्यामध्ये सातूचे पीठ मिसळा. चव आणि ग्रेव्ही दोन्ही वाढेल.
6 पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घाला. तेल कमी लागेल.
7 कांदे बटाटे एकत्र ठेवू नका. या मुळे बटाटे लवकर खराब होतात.
8 पराठे तेलात शेकण्या ऐवजी बटर मध्ये शेकावे ,चव वाढेल.