Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लेकाचा अपघातात मृत्यू, वृत्त समजताच आईनंही सोडला जीव

death in an accident
Webdunia
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (15:23 IST)
मुलाला साधी ठेचही लागली तरी आईचं मन कासावीस होतं. अशात आई आणि मुलाच्या अतूट नात्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे एका मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती कळताच, आईचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.अवघ्या काही तासांच्या अंतराने अशाप्रकारे मायलेकाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेंद्र दत्तात्रय गागरे असं अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर नलिनी दत्तात्रय गागरे असं हृदयविकाराच्या झटक्याने गतप्राण झालेल्या आईचं नाव आहे. मृत राजेंद्र हा एलआयसी एजंट म्हणून काम करतो, तर त्याची आई या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहे.
 
घटनेच्या दिवशी मृत राजेंद्र हा लोणीहून आपल्या घरी दुचाकीने जात होता. दरम्यान राहाता तालुक्यातील लोणी-कोल्हार रस्त्यावरून जात असताना, राजेंद्रच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला.
 
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसेच पोलिसांनी अपघाताची माहिती राजेंद्र यांच्या कुटुंबीयांना कळवली.
मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, आई नलिनी दत्तात्रय गागोरे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना देखील यश आलं नाही.
 
मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच आईनं देखील अखेरचा श्वास सोडला आहे. एकाच दिवशी मायलेकाचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गावात शोककळा पसरली होती. कुटुंबीयांनी दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार केले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

भोपाळमध्ये अनेक विद्यार्थिनींशी मैत्री केल्यानंतर बलात्कार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले

सुरक्षा दलांनी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

महिलांनी टिकल्या काढल्या अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या पीडितांनी वेदना व्यक्त केल्या

पुढील लेख
Show comments