Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ड्रायव्हरच्या नोकरीची ऑफर; वाद वाढत जाणार?

Webdunia
सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (07:36 IST)
राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले असले तरी दोन्ही गटांमध्ये सारे काही आलबेलल नसल्याचे स्पष्ट होत आहे. दोन्ही गटातील आमदार तब्बल ३६ दिवसांनंतरही मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार निलेश राणे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातील वाद पुन्हा एकदा तापला आहे. निलेश राणे यांनी केसरकर यांना थेट ड्रायव्हरची नोकरी देऊ केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाचे संकेत मिळू लागले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी नारायण राणे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बदनामी केल्याचे ते म्हणाले होते. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्याचे निवेदन केसरकर यांनी दिले होते. मात्र, यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. आता निलेश राणेंनी केसरकरांवर थेट टीका केली आहे.
राणे म्हणाले की, ‘दीपक केसरकर म्हणतात की मी राणेंसोबत काम करायला तयार आहे. जॉब मागायचा असेल तर नीट विचारा. आमच्याकडे ड्रायव्हरची एक जागा रिकामी आहे. विशेष म्हणजे दीपक केसरकर यांनी वादातून माघार घेतली. नुकतेच ते म्हणाले की, यापुढे राणेंबाबत वक्तव्य करणार नाही.
केसरकर म्हणाले की, “काल मी मांडलेले मुद्दे बाजूला सारले जात आहेत. माझ्या कुटुंबावर आरोप होत असताना तुम्ही गप्प बसलात, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यांच्या याच विधानाला मी उत्तर दिले. आम्ही गप्प बसलो नाही. तर, मी याबाबतची तक्रारही पंतप्रधान मोदींकडे केली होती.”
केसरकर पुढे म्हणाले की, “माझ्यात आणि नारायण राणे यांच्यात वाद झाला होता, हे सर्वज्ञात आहे. मात्र प्रत्येक घटनेचा त्यांच्याशी संबंध जोडणे चुकीचे आहे. त्यावेळी मी त्यांच्याशी अत्यंत आदराने वागलो. मी राणेंसोबत असल्याचे मी अनेकदा सांगितले आहे. त्यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. त्यांच्यासोबत जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याची वेळ आली तर मी नक्कीच तयार आहे. “शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करणे चुकीचे आहे, त्यामुळे मी त्यांचे नाव घेत नाही. मी त्यांच्याबद्दल बोललो तर ते वाईट बोलल्यासारखे आहे. तसेच आता मी नारायण राणेंच्या विरोधातही बोलणार नाही.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे-शिवसेना नेते संजय शिरसाट

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

पुढील लेख
Show comments