Dharma Sangrah

IND vs ENG : कोहलीच्या पुनरागमनाबाबत BCCI ने दिले एक मोठे अपडेट

Webdunia
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (10:01 IST)
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, तिन्ही कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र कोहलीच्या पुनरागमनाबाबत सस्पेंस कायम आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने याबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. गुरुवारी बीसीसीआयचे अधिकारी आणि निवड समिती यांच्यात बैठक होणार असून त्यानंतर पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. 
कोहलीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. विराटने टीम मॅनेजमेंटशी चर्चा केलेली नाही आणि निवडकर्त्यांशीही चर्चा झालेली नाही. 
 
अधिकाऱ्याने असेही सांगितले की पण एक गोष्ट निश्चित आहे की विराट कोहली स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध घोषित करताच त्याला संघात समाविष्ट केले जाईल. विराट कोहली पहिले दोन कसोटी सामने खेळला नव्हता. विराट दुस-यांदा वडील होणार असून कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतल्याचे समजते.
Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

GT vs RR : दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने

ऋषभ पंतने LSG च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला; फ्रँचायझीची प्रतिक्रिया

आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली

GT vs RR : दुसरा अंतिम सामना कोणता संघ जिंकणार, गुजरात आणि राजस्थान भिडणार

SRH vs RR : वैभवच्या स्फोटक खेळीने हैदराबादचा धुव्वा उडवला, राजस्थाने बनवले २४३ रन

पुढील लेख
Show comments