rashifal-2026

लेकाचा अपघातात मृत्यू, वृत्त समजताच आईनंही सोडला जीव

Webdunia
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (15:23 IST)
मुलाला साधी ठेचही लागली तरी आईचं मन कासावीस होतं. अशात आई आणि मुलाच्या अतूट नात्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे एका मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती कळताच, आईचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.अवघ्या काही तासांच्या अंतराने अशाप्रकारे मायलेकाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेंद्र दत्तात्रय गागरे असं अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर नलिनी दत्तात्रय गागरे असं हृदयविकाराच्या झटक्याने गतप्राण झालेल्या आईचं नाव आहे. मृत राजेंद्र हा एलआयसी एजंट म्हणून काम करतो, तर त्याची आई या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहे.
 
घटनेच्या दिवशी मृत राजेंद्र हा लोणीहून आपल्या घरी दुचाकीने जात होता. दरम्यान राहाता तालुक्यातील लोणी-कोल्हार रस्त्यावरून जात असताना, राजेंद्रच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला.
 
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसेच पोलिसांनी अपघाताची माहिती राजेंद्र यांच्या कुटुंबीयांना कळवली.
मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, आई नलिनी दत्तात्रय गागोरे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना देखील यश आलं नाही.
 
मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच आईनं देखील अखेरचा श्वास सोडला आहे. एकाच दिवशी मायलेकाचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गावात शोककळा पसरली होती. कुटुंबीयांनी दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार केले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

इराणी शाळेवर इस्रायली हवाई हल्ला; ५० हून अधिक महिला विद्यार्थ्यांसह ८५ जणांचा मृत्यू

इराणी ड्रोनने दुबई विमानतळावर हल्ला केला

इस्रायलच्या हवाई हद्द बंदीमुळे पाच तास हवेत राहिल्यानंतर एअर इंडियाचे विमान मुंबईत परतले

नागपूर बॉम्बस्फोटात १८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक मदत जाहीर केली

पुढील लेख
Show comments