Raksha Bandhan 2019 : 15 ऑगस्ट रोजी या वेळेस बांधा Rakhi, मिळेल विशेष फळ

सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (13:54 IST)
Raksha Bandhan Rakhi muhurat 2019 : या वर्षी रक्षाबंधन हा सण 15 ऑगस्ट रोजी आहे. स्वतंत्रता दिवशी भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा सण साजरा करण्यात येईल. ज्योतिषिनुसार यंदा रक्षाबंधनावर भद्रा नाही आहे. म्हणून पूर्ण दिवस राखी बांधण्यासाठी शुभ राहणार आहे. बरेच असे संयोग देखील बनतील, ज्यामुळे ह्या सणाचा महत्त्व अधिकच वाढून जाईल. 4 दिवस आधी अर्थात 11 ऑगस्ट रोजी गुरु मार्गी होत असून सरळ चालणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी किमान 13 तास शुभ मुर्हूत राहणार आहे. जेव्हा की दुपारी 1:43 ते 4:20पर्यंत राखी बांधण्याने विशेष फळ मिळतील.
 
या वेळेस राखी बांधण्यासाठी जास्त वेळेचा मुहूर्त आहे. 15 ऑगस्टच्या सकाळी 5 वाजून 49 मिनिटापासून संध्याकाळी 6 वाजून 01 मिनिटापर्यंत राखी बांधता येईल. राखी बांधण्यासाठी 12 तास 58 मिनिटाचा वेळ मिळेल. शुभ मुहूर्त दुपारी साडेतीन तास राहणार आहे. या वेळेस 19 वर्षांनंतर रक्षाबंधन आणि स्वतंत्रता दिवस एकवेळेस साजरा करण्यात येईल. चंद्र प्रधान श्रवण नक्षत्राचा संयोग फार खास राहील. सकाळपासूनच सिद्धी योग बनेल ज्यामुळे सणाची महत्ता अधिक वाढणार आहे.
 
नाही राहणार आहे भद्राचा योग
ज्योतिषाचार्यानुसार या वेळेस रक्षाबंधन भद्रा मुक्त राहणार आहे. भद्राच्या वेळेस कुठलेही शुभ कार्य करणे वर्जित मानण्यात आले आहे. म्हणून भद्रा काळात राखी नाही बांधायला पाहिजे. पण यंदा बहिणी सूर्यास्त होईपर्यंत केव्हाही राखी बांधू शकते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख राखीचा सण साजरा करताना राशीप्रमाणे या रंगाचे कपडे परिधान करा