
तूळ-व्यवसाय
तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये चांगले व्यावसायिक कौशल्य असते व या व्यक्ती व्यापारात चांगले यश मिळवतात. या राशिचे लोक लोखंड दारू तंबाखू पान सोने आदी धंद्यात चांगल्याप्रमाणात यश मिळेल. यांना अशाही व्यवसायात यश मिळेल जे व्यवसाय समाज्याच्या दृष्टीने हीन समजले जातात. अगरबत्ती सुगंधाशी संबंधित व्यापार म्हणजे अगरबत्ती अत्तर सेंट इ. आपल्यासाठी अनुकूल राहील.